श्रीभालचंद्र महाराजांचे भाविक भक्त अनेक आहेत. परंतु काया, वाचा, मने त्यांची निस्सीम सेवा करणारे, त्यांच्या चरणी लीन होणारे जे काही मोजकेच भक्त आहेत, सेवक आहेत त्यात मुंबईतील समर्थ औषधालयाचे मालक ह.भ.प. श्रीधर यशवंत रेवंडकर व त्यांच्या पत्नी सौ. सुरजप्रभा या होत. मुंबईत श्रीबाबांचे दुसरे परम भक्त म्हणजे जे मनाने, कृतीने आणि प्रकृतीने विशाल आहेत. किंबहुना ज्यांच्या श्वासोच्छ्वासातूनही ‘हरि ॐ’ चा मंत्र चालू असतो असे थोर उद्योगपती ह.भ.प. हरि ॐ पांडुरंग बाळाजी बागवे हे होत. ‘लहानपण देगा देवा.’ या श्री तुकोबांच्या महान शिकवणुकीचे ते नेहमीच योग्य पालन समाजात वावरत असतात.
श्रीबाबांचे त्यांना फार आकर्षण आहे. कोल्हापूरचे शांताराम कृष्णाजीपंत वालावलकर यांचे सारखेही आणखी श्रीबाबांचे परम भक्त आहेत. सौजन्यमूर्ती बापूसाहेबांनी श्रीबाबांच्या कार्यास बराच हातभार लावला आहे. याशिवाय संबंध महाराष्ट्रांत व इतरही त्यांचे लहान थोर अनेक भक्त आहेत.
– राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!