ज्योती जाधव
कर्जत : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्याने ग्रामसेवकांशी संबंधित असणाऱ्या कामांसाठी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यांची ग्रामसेवकांशी भेट होत नाही. परिणामी, एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तालुक्यातील वैजनाथ, हुंमगाव, किरवली, कोंदिवडे, तिवरे, वरई आदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अनेकदा संबंधित ग्रामसेवक उपस्थित नसतात.
नावनोंदणी, विवाहनोंदणी, जन्म-मृत्यू नोंद, तक्रारी अर्ज स्वीकारणे, ग्रामसभा आयोजित करणे आदी कामे ग्रामसेवकांची असतात. कर्जत तालुक्यात जमीन खरेदीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. जमीन खरेदी तसेच शेत घर बांधण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ आदी कामांसाठी नागरिक संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात जातात.
मात्र ग्रामसेवकच कार्यालयात उपस्थित नसल्याने या नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. खेदाची बाब म्हणजे ग्रामसेवकांशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा ग्रामसेवक फोनच उचलत नाही, तर कधी कधी फोनच लागत नाही. याबाबत गटविकास अधिकारीही कानाडोळा करत असल्याची चर्चा आहे.
ग्रामसेवक कधी कोणत्या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात असणार याचे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे क्रमप्राप्त आहे. तसेच त्यांचे मोबाइल नंबर लिहिणे आवश्यक आहे. तरीही ग्रामपंचायत कार्यालयात या नियमांचे पालन केले जात नाही. – अशोक गायकवाड, कर्जत
ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत काही तक्रार असल्यास कर्जत पंचायत समिती कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार अर्ज द्यावे. – चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पं. स.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…