राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक – सुधीर मुनगंटीवार

Share

मुंबई : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची चर्चा २०१७ साली झाली होती; असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. २०१७ साली शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली. त्याचे प्रायश्चित्त भोगतोय, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुनगंटीवार यांनी म्हटले की, २०१४ मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. तरी आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवले. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चा देखील झाली. पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावे असे आमचे मत नव्हते. त्यामुळे आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे.

जीएसटी संदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा पेट्रोल डिझेल वरचा कर हा केंद्रापेक्षा जास्त आहे. पण खोटे काय बोलत आहेत की आमचा जीएसटी दिला नाही. जीएसटी हा डायरेक्ट राज्याच्या अकाउंटमध्ये जातो. हा जो न दिलेला जीएसटी आहे, तो राज्यांना १४ टक्के वाढीव दिला जाणारा परतावा आहे, जो कोरोना काळात सगळ्याच राज्यांचा गेला, आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो हे जे सांगता म्हणजे तुम्ही कर भरता का? मुंबईत सर्वच मोठ्या कंपनीचे ऑफिस आहे म्हणून आयटी रिटर्न मुंबईतून भरले जाते. पण मनात येईल ते बोलायचे, केंद्राविरुद्ध भावना भडकवायच्या, देशात आणि मुंबईत फरक करायचा, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मागच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत, मग मुंबई आमची आहे असे आम्ही पण म्हणू शकतो, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

6 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

7 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

8 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

8 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

9 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

10 hours ago