महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट

मुंबई : महाराष्ट्रात धुळ्यात ८९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे त्याठिकाणाहून धुळ्यात या तलवारी आल्या आहेत. जालनाला या तलवारी पाठवण्यात येणार होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशाला? कुणाला दंगल घडवायची आहे? महाराष्ट्रात तलवारी पाठवणारे राजस्थानमधील कोण लोक आहेत? या प्रकरणाचा खोलवर तपास केला पाहिजे. ठाकरे सरकार ही चौकशी करणार का? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी केला आहे.


https://twitter.com/ramkadam/status/1519526429276336129

राजस्थानातील चितोडगड येथून जालना येथे शस्त्रास्त्रे नेणाऱ्या चौघांना मुंबई आग्रा महामार्गावर गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांनी बुधवारी सकाळी ७ वाजता पाठलाग करून पकडले. त्यांच्या वाहनातून तब्बल ८९ तलवारी आणि एक खंजीर जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जालना येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट तर सुरू नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


सोनगीर पोलिसांना वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी संशयास्पद कार नजरेस पडली. पोलिसांनी कारसह सुमारे ७ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रहिम आणि कपिल विष्णू दाभाडे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८४, २३९, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो