पोलादपूर तालुक्यातील लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात सोमवारी वादळीवाऱ्याचा जोरदार तडाखा

शैलेश पालकर


पोलादपूर : तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक लोकवस्त्यांना जोरदार तडाखा दिल्याने आर्थिक हानी झाल्याचे दिसून आले. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही.


पोलादपूर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून येऊन सोसाट्याचा वारा सुटला आणि वादळी वाऱ्याने धुळीचे लोट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटच्या रस्त्यावरून उधळले गेले. यामुळे काही काळ वाहनांना कमी वेग ठेऊन प्रखर प्रकाश झोतामध्ये सायंकाळी पाच वाजल्यानंतर वाहने चालवावी लागली.


याचदरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शेलार ढाब्याच्या नवीन आकर्षक इमारतीची एक भिंत वादळी वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने कोसळली. यावेळी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या तीन मोटारसायकलींवर भिंतीतील जांभा दगड पडल्याने मोटारसायकलींची हानी झाली. यावेळी तुर्भे बुद्रुक भिकू गणपत पवार यांचे राहते घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले, तर तुर्भे बुद्रुक मंदिर पत्र्याचे नुकसान झाले. सवाद धारवली सप्तक्रोशी विभागातही वावे गावात घराचे पत्रे उडाल्याच्या घटनांनी अनेकांचे आर्थिक नुकसान ओढवले आहे.


पोलादपूर तहसील कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यात वादळीवाऱ्यामुळे घरे व इमारतींचे नुकसान झाले असले तरी कोठेही मनुष्याला इजा अथवा जिविताची हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

'महाविस्तार ॲप' जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

कृषी विभागाचा एआय तंत्रज्ञानावर विशेष भर ; १८ हजार वापरकर्ते अलिबाग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय

पनवेल पालिका भाजप निवडणूक प्रभारीपदी रामशेठ ठाकूर

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार

रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

उद्या कौल कोणाच्या बाजूने लागणार? अलिबाग : जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते;

अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाई मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत

जिल्ह्यासाठी २८८ कोटींचा विकासनिधी

आराखड्यापैकी ६० टक्के निधी मिळाला, ५० टक्क्यांचे वितरण अलिबाग : राज्य सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. मात्र

ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या