Tuesday, March 18, 2025
Homeक्रीडाहैदराबादचे लक्ष्य विजयी षटकारासह अव्वल स्थानाचे

हैदराबादचे लक्ष्य विजयी षटकारासह अव्वल स्थानाचे

गुजरात टायटन्सशी आज गाठ

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील ४०व्या लढतीत मंगळवारी (२७ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे तगडे संघ आमने-सामने आहेत. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबादने कमालीचे सातत्य राखताना सलग पाच सामने जिंकलेत. यंदाच्या हंगामात विजयाचा ‘पंच’ लगावणारा तो पहिला संघ आहे.

७ सामन्यांतून ५ विजयांसह १० गुण मिळवणारा सनरायझर्स संघाला विजयाचा ताज्या गुणतालिकेत विजयाचा षटकार खुणावत आहे. सलग सहावा विजय नोंदवताना प्रतिस्पर्धी गुजरातला मागे टाकून अव्वल स्थानी झेप घेण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

सध्याचा तुफानी फॉर्म पाहता हैदराबादचे पारडे जड असले तरी टॉपला असलेल्या गुजरातवर वर्चस्व राखणे तितके सोपेही नाही. यंदाच्या मोसमाद्वारे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरातने ७ पैकी ६ सामने जिंकलेत. १२ गुणांसह ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत. पहिल्याच हंगामात दोनदा सलग तीन विजय मिळवण्याची करामत साधणारा गुजरात संघ विजयाचा चौकार लगावण्यास आतुर आहे. मात्र त्यांच्यासमोरही तगडे आव्हान आहे.

हैदराबादकडून आयडन मर्करमसह राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी थोडी फार चांगली फलंदाजी केली आहे. मात्र, सनरायझर्सच्या विजयी मालिकेत गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. त्याचे क्रेडिट मध्यमगती गोलंदाज टी. नटराजन (१५ विकेट) आणि उमरान मलिक (१० विकेट) तसेच भुवनेश्वर कुमार (९ विकेट) यांना जाते. त्यामुळे बॉलर्सना बॅट्समनची साथ मिळाली, तर हैदराबादला सातत्य राखणे सोपे जाईल.

गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्यासह शुभमन गिलने फलंदाजीत चांगला फॉर्म राखला आहे. त्यांना डेव्हिड मिलरची चांगली साथ लाभली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तसेच लेगस्पिनर राशिद खानने बॉलिंगची भिस्त सांभाळली आहे. तरीही काही प्रमुख बॅटर आणि बॉलर्सचा फॉर्म चिंतेची बाब आहे. त्यांनी खेळ उंचावला, तर गुजरातची पुढील वाटचाल आणखी सुकर होईल.

वेळ : ७.३० वा. ठिकाण : वानखेडे स्टेडियम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -