मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवास्थानावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत. सदावर्तेंना ८ एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवास्थानातून सिल्व्हर ओक येथील हल्ल्यामागे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे माथी भडकवल्याचा आरोप करत अटक करण्यात आली होती. मात्र, आता अखेर तब्बत १८ दिवसांनी सदावर्ते बाहेर आले आहेत. तुरुंगातून सुटका होताच सदावर्तेंनी हा हिंदुस्थान्यांचा विजय असल्याचे म्हटले आहे.
तुरुंगातून बाहेर पडताना सदावर्ते म्हणाले की, या कठीण काळात माझा मित्र परिवार, हिंदुस्थानातील जनता आणि कष्टकरी बांधन माझ्यासोबत राहिले. तसेच येथून आमचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम जेजे करता येईल ते आम्ही करू. परंतु जय श्री राम म्हणणारे जय भीम म्हणणारे आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात अशा घोषणा सदावर्ते यांनी यावेळी दिल्या. हा विजय हिंदुस्थान्यांचा आणि कष्टकरी बांधवांचा आहे.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…