आचरा रोडवर खासगी बसला अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आचरा रोडवर कलमठ मच्छीमार्केटजवळ स्वामी रामेश्वर या खासगी बसला अपगात झाला. पोलीस स्टेशनपासून सुरू होणाऱ्या उतारावर ब्रेक न लागल्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबावर आदळली. यामुळे वीजेचा खांब मोडला. वीजेच्या ताराही तुटल्या, तर एका पानटपरीचेही नुकसान झाले. तथापि, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे.


रविवारी सकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्ता ओला झाला होता. त्याचवेळी कणकवली पोलीस स्टेशनपासून सुरू होणाऱ्या उतारावर मुंबई ते आचरा जाणारी खासगी बस क्र. एम.एच.०९ एफ.एल.९०९९ च्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. त्यातच रविवार असल्याने कलमठ मासळी बाजारात गाड्या व माणसांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बस मच्छीमार्केटच्या आधी थांबणे गरजेचे होते, अन्यथा अनर्थ झाला असता. यावेळी रस्त्याच्या कडेला गाडी घेत असताना विजेच्या खांबावर बस चढली आणि अपघात झाला.


दरम्यान, अपघात झाल्याचे समजताच दळवी कॉलनीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. तसेच रस्त्यावरील गर्दी कमी करत रस्ताही मोकळा केला.

Comments
Add Comment

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला नवी उभारी!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग

चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी!

वीज पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्याकडून अडीच कोटींचा निधी कणकवली : सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज

४५० वर्षांची परंपरा जपणारी शिराळे गावची ‘गावपळण’सुरू

गावाबाहेरील राहुट्यांत नागरिकांनी थाटला संसार वैभववाडी : दरवर्षी होणाऱ्या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी

Taj Hotel In Kokan : कोकणात 'ताज'चं आगमन! सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा मार्ग मोकळा

ताज ग्रुपच्या आलिशान प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल' सिंधुदुर्ग : निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता

जिल्ह्यात ३१ ठिकाणी ‘५ जी’ मोबाईल टॉवर

कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर

मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक