महिला अधिकाऱ्याला छळणाऱ्या ‘बुवा’ला अटक

कल्याण (प्रतिनिधी) : एका शासकीय अधिकारी महिलेशी लगट करून ओळख वाढवित तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून नंतर लाखो रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ‘बुवा’ नावाने परिचित असलेल्या स्त्री लंपटाच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.


या बुवाचे पोलिसांबरोबर अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा मांडा - टिटवाळ्यात सुरू असून पोलिसांनी या संबंधाला फाटा देत पीडित महिला अधिकाऱ्यांची तक्रार रजिस्टर करीत त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. स्त्री लंपट असलेला संपत शिरसाट उर्फ बुवा हा टिटवाळा येथे हॉटेल चालवीत असून एका सोसायटीत तो राहत आहे.


गेल्या वर्षी महिला अधिकारी दुपारच्या दरम्यान बुवाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या. त्यावेळेस या महिला अधिकाऱ्याला तुमचा स्टाफ देखील हॉटेलमध्ये जेवायला येत असल्याची माहिती सांगत पीडितेकडून मोबाईल नंबर मिळवला. यानंतर त्यांचे बोलणे मोबाईलवर सुरू होते. त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला. महिला अधिकारी शासकीय कामकाजाच्या फेरफटका मारीत असताना जेवणाकरिता या हॉटेलमध्ये येत होत्या.


१५ जुलै २०२० रोजी ‘बुवा’चा वाढदिवस असल्याने रात्रीच्या दरम्यान पीडितेच्या घरी जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध त्याने शारीरिक संबंध ठेवले. नंतर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवीत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित ठेवले. संपत उर्फ बुवा याचे लग्न झाल्याचे तसेच त्याला दोन मुले असल्याची माहिती मिळाल्याने पीडितेने त्याच्याशी संबंध तोडले. मात्र बुवाने पिडीतेबरोबर अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकीत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.


अनेकदा बांधकाम वाचविण्याकरिता नागरिकांकडून हजारो रुपये घेतले जात असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. गाळा घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करीत पीडितेने पैसे न दिल्याने चामडी पट्ट्याने मारीत त्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केल्याने अखेर या पीडित अधिकारी महिलेने होत असणाऱ्या छळास कंटाळून कल्याण तालुका पोलीस ठाणे गाठून ‘बुवा’ विरुद्ध बलात्कार तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक राम भालसिंग याप्रकरणी अधिक तपास करीत असून ‘बुवा’च्या पोलिसांनी मात्र मुसक्या आवळल्या आहेत.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

डेहराडूनमध्ये ढगफुटी, दोन बेपत्ता; बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू

डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार उडाला आहे. शहराच्या

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे