आरोग्य विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिलेल्या गोळ्या बुरशीयुक्त!

भंडारा : भंडारा तालुक्यात अकरावीच्या विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्याने विद्यार्थी, पालकांसह आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 'राष्ट्रीय जंतनाशक दिना' निमित्त सोमवारपासून भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने एक ते एकोणीस वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम सुरू केली. भंडारा तालुक्यातील खरबी येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सोमवारी सकाळी ११ वाजता जंतनाशक गोळ्या वितरण सुरु केले होते.


या शाळेत ४५० गोळ्या वितरणासाठी आरोग्य विभागाने दिल्या होत्या. अकरावीच्या विद्यार्थ्यांना गोळ्या वितरित करीत असताना एका स्ट्रिपमध्ये काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी गोळ्यांचे वितरण तातडीने थांबवले आणि त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली. विशेष म्हणजे या बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून ७ विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्याचे समोर आले.


त्यानंतर या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात झाली. संबंधित बॉक्स मधील अनेक स्ट्रिपमध्ये बुरशीयुक्त गोळ्या आढळून येत असल्याने भंडारा आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले असून आरोग्य विभागाच्या या जीवाशी खेळण्याचा प्रकारामुळे पालक मात्र कमालीचे संतप्त झाले.


या प्रकाराची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह शाळेला भेट दिली. बॅच क्रमांक एईटी २१६ मध्ये तीन गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्याचे चौकशीत आढळून आले. या गोळ्या ताब्यात घेत बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून ज्या सात विद्यार्थ्यांनी गोळ्या घेतल्या त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांची प्रकृती अद्याप व्यवस्थित असून आरोग्य विभागाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीतील स्थगितीने सर्वच पक्ष नाराज

कायदेशीर सल्ला घेऊन निवडणुका पुढे ढकलल्या : राज्य निवडणूक आयोग आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला :

राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होणार

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक; २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, मतदानासाठी

मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.