Categories: ठाणे

डावखरे, केळकरांनी केला कंदील पेटवून आघाडी सरकारचा निषेध

Share

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील छुप्या भारनियमनाविरोधात भाजपच्या वतीने आज कंदील आंदोलन करण्यात आले. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी विजेचे भारनियमन व वाढीव सुरक्षा ठेवींचा निर्णय रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय जाहीर केला.

महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच राज्यातील जनतेला भारनियमनात ढकलल्यासंदर्भात निषेध व्यक्त केला. तसेच सक्तीची वसुली थांबविण्याची मागणी केली. या आंदोलनात भाजपचे शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, रमेश आंब्रे, बाळा केंद्रे, वीरसिंग पारछा, कृष्णा भुजबळ, विक्रम भोईर, ओमकार चव्हाण, भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर, महिला आघाडीच्या श्रुती महाजन, स्वप्नाली साळवी, श्रुतिका मोरेकर, सुषमा ठाकूर आदी सहभागी झाले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.

सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे, असा आरोप आमदार डावखरे व आमदार केळकर यांनी केला.

कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता भारनियमनाऐवजी देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीज वितरणच बंद ठेवून जनतेला वेठीस धरले जात आहे. सामान्य ग्राहकाने एक बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो.

पण सरकारी विभागांकडे महावितरणची कोट्यवधींची थकबाकी प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारने थकबाकी महावितरणकडे भरावी. तसेच महावितरणने सुरक्षा अनामत रक्कम आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला.

Recent Posts

नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळायचं… हेच तुमचं राजकारण का? फडणवीसांनी वडेट्टीवारांना फटकारले!

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६…

16 minutes ago

“तुमच्या नेत्यांना आवरा!” काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा  नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…

20 minutes ago

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…

34 minutes ago

Vijay Deverakonda : ‘छावा’ पाहून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा संतापला!

मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर…

35 minutes ago

पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा आरोप

नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात…

55 minutes ago

Ranveer Allahbadia: सुप्रीम कोर्टाचा रणवीर अलाहाबादियाला मोठा दिलासा, जप्त केलेला पासपोर्ट परत मिळणार

मुंबई: प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) कडून मोठा दिलासा मिळाला…

1 hour ago