'राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा'

मुंबई : ज्या राणा दाम्पत्यासाठी भाजपावाले आगपाखड करत आहेत त्यांनी राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा विषय बाहेर काढून नविन वादाला तोंड फोडले आहे.


राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले असता त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चप्पलफेक केली. सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरले आहे. दिल्लीत जाण्याएवढे महाराष्ट्रात काय झाले आहे? असा सवालही त्यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.


यावेळी ते म्हणाले, हे सर्व महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे. काही समस्या आणि प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे. यूपीमध्ये अत्याचार झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोन्हीकडे एकत्र लावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


दोन चार लोक दिल्लीला जातात. माध्यमांना प्रतिक्रिया देतात आणि महाराष्ट्राची बदनामी करतात, असेही त्यांनी सांगितले आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संजय पांडे हे एक निष्पक्ष आणि सक्षम पोलिस अधिकारी आहेत. ते प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आरोप करु नयेत, असेही ते म्हणाले.


दरम्यान, सध्या राज्यात सुरु असलेल्या हनुमान चालीसा पठणावरून सध्या राजकारण तापले आहे. यावरून राऊतांनी हे लोक फ्रॉड आणि बोगस असुन आम्हाला हनुमान चालीसा पठण कसे करावे हे सांगत असल्याचे म्हणत खुलासा केला आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र