सिंधुदुर्गात प्रार्थनास्थळ, सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे काढण्याची मागणी

Share

सिंधुदुर्ग (हिं.स.) : प्रार्थनास्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे त्वरित काढावे तसेच अधिकृत भोंग्यांची ध्वनिप्रदूषण मात्रा तपासून कारवाई करावी, अशी मागणी ‘समस्त हिंदूत्ववादी संघटना कुडाळ’ यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन आज संघटनेच्या वतीने कुडाळ पोलिसांना देण्यात आले.

आज कुडाळ पोलिस ठाण्यात जाऊन हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, वर्ष २००० मध्ये ‘ध्वनीप्रदूषण अधिनियम आणि नियंत्रण’ नावाचा एक कायदा निर्माण करण्यात आला आहे. या कायद्यातील ५ व्या तरतुदीनुसार, ध्वनीक्षेपक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील आवाज यांच्यावर विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु, हा कायदा डावलून शहरात काही धार्मिकस्थळांवरुन भोग्यांचा वापर केला जात आहे.

वर्षातील काही विशिष्ट दिवशी परवानगी घेऊन धार्मिकस्थळांवरुन भोंग्यांचा वापर करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, कायदा मोडून होत असलेल्या ध्वनिप्रदूणास आमचा विरोध असल्याचे समस्त हिंदूत्ववादी संघटनेने म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांना देण्यात देण्यात आले.

Recent Posts

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

4 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

4 hours ago

तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…

4 hours ago

Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…

7 hours ago

Eknath Shinde : संयम राखावाच लागेल, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचे आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…

7 hours ago

Hathras stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२२ लोकांचा मृत्यू

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…

8 hours ago