Thursday, July 10, 2025

सिंधुदुर्गात प्रार्थनास्थळ, सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे काढण्याची मागणी

सिंधुदुर्गात प्रार्थनास्थळ, सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे काढण्याची मागणी

सिंधुदुर्ग (हिं.स.) : प्रार्थनास्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे त्वरित काढावे तसेच अधिकृत भोंग्यांची ध्वनिप्रदूषण मात्रा तपासून कारवाई करावी, अशी मागणी 'समस्त हिंदूत्ववादी संघटना कुडाळ' यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन आज संघटनेच्या वतीने कुडाळ पोलिसांना देण्यात आले.


आज कुडाळ पोलिस ठाण्यात जाऊन हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, वर्ष २००० मध्ये 'ध्वनीप्रदूषण अधिनियम आणि नियंत्रण' नावाचा एक कायदा निर्माण करण्यात आला आहे. या कायद्यातील ५ व्या तरतुदीनुसार, ध्वनीक्षेपक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील आवाज यांच्यावर विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु, हा कायदा डावलून शहरात काही धार्मिकस्थळांवरुन भोग्यांचा वापर केला जात आहे.


वर्षातील काही विशिष्ट दिवशी परवानगी घेऊन धार्मिकस्थळांवरुन भोंग्यांचा वापर करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, कायदा मोडून होत असलेल्या ध्वनिप्रदूणास आमचा विरोध असल्याचे समस्त हिंदूत्ववादी संघटनेने म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांना देण्यात देण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >