नवी मुंबईतील गतिरोधक पांढऱ्या पट्ट्यांपासून वंचित

नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा पुनर्विकास चालू आहे, तर मुख्य रस्ते प्रशस्त व सिमेंट काँक्रीटचे केले जात आहेत. यामुळे वाहनचालक भरधाव वाहने हाकत आहेत. वेगावर प्रतिबंध राहत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत म्हणून गतिरोधकांची निर्मिती केली आहे. पण गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नसल्याने आता वाहन आपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.


नवी मुंबईमधील एमआयडीसी, बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, ऐरोली, घणसोली, दिघा, कोपरखैरणे या आठही विभाग कार्यालय क्षेत्रांतील अंतर्गत व मुख्य रस्ते चकाचक केले गेले आहेत; परंतु बेफिकीर दुचाकी, चारचाकी, रिक्षाचालक वाहने भरधाव हाकत आहेत. यावर उपाय म्हणून गतिरोधकांची बांधणी पालिकेकडून करण्यात आली; परंतु गतिरोधकांची निर्मिती करताना चालकांच्या लक्षात येऊन ते दिसावेत यासाठी पांढरे पट्टे मारणे अनिवार्य आहेत, मात्र ते मारले नसल्याने अपघात होत आहेत.


सारसोले स्मशानभूमीकडून जुईनगर सेक्टर २३ कडे येताना नर्सरीच्या पुढे दोन महिन्यांपूर्वी गतिरोधक बांधले. पण अजून पांढरे पट्टे मारले नाहीत. याविषयी प्रशासनाला कळवूनही कार्यवाही केली गेली नाही. हीच परिस्थिती सर्व शहरात आहे.


- श्रीधर मढवी, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई

याबाबतीत सर्वच कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या जातील. त्यानंतर कार्यवाही केली जाईल.


- संजय देसाई, शहर अभियंता, पालिका
Comments
Add Comment

वर्गणीविना दीपोत्सवाचा नवा आदर्श!’

आदित्य कांबळे यांचा ‘दिया फॉर युनिटी’ उपक्रम आज खारघरमध्ये उजळणार नवी मुंबई : खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक

मंडला ते चेंबूर हा मेट्रो २ बीचा पहिला टप्पा सुरू होणार

मुंबई  : मुंबईमध्ये लवकरच आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महिन्यातच

गेल्या बावीस महिन्यांत फटाक्यांमुळे १८२ आगी

शिंपोलीत फटाक्याच्या रॉकेटमुळे चार दुकानांना आग मुंबई : मुंबईत यंदा दीपावलीच्या सणानिमित्त केल्या जाणाऱ्या

कफ परेडच्या आगीत एकाचा मृत्यू, ३ जण गंभीर ; एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई: कफ परेड येथील मच्छीमार नगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना

रेल्वे कर्मचारी प्रवाशांना रांगेत देणार तिकीट

तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा ‘एसटी पॅटर्न’ मुंबई : दिवाळी आणि छट पूजेसाठी गावी जाणाऱ्या

आज आहे लक्ष्मीपूजन: धन, समृद्धी आणि ऐश्वर्याचे स्वागत!

मुंबई : लक्ष्मीपूजन हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील मुख्य