मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३०व्या लढतीमध्ये सोमवारी (१९ एप्रिल) सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या लढतीद्वारे श्रेयस अय्यर आणि सहकाऱ्यांसमोर सलग तिसरा पराभव टाळण्याचे आव्हान आहे.
राजस्थानने पाच सामन्यांतून तीन विजयांसह (६ गुण) गुणतालिकेत अव्वल चार संघामध्ये स्थान राखले आहे. रॉयल्सनी सलग दोन विजय मिळवत आश्वासक सुरुवात केली. मात्र,बंगळूरुविरुद्ध पराभव पाहावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सवर मात करताना ते विजयीमार्गावर परतले. मात्र, मागील लढतीत गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव झाला. त्यामुळे टॉप फोरमधील स्थान कायम राखायचे असेल तर संजू सॅमसन आणि सहकाऱ्यांना विजय आवश्यक आहे.
राजस्थानकडून जोस बटलरने (एक शतक आणि एक अर्धशतक) फलंदाजीत चांगले योगदान दिले आहे. कर्णधार सॅमसनसह शिमरॉन हेटमायरने प्रत्येकी एक हाफसेंच्युरी मारली आहे. मात्र, देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली आहे.
गोलंदाजीत लेगस्पिनर युझवेंद्र चहलने कमालीचे सातत्य राखले तरी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट वगळता अन्य बॉलर्सना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विन आणि एम. प्रसिध कृष्णा हे निष्प्रभ ठरलेत. कोलकाता संघाला ६ सामन्यांत दोन पराभवांचा सामना करावा लागला. ते सलग आहेत. नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कॅप्टन श्रेयस, वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी एक अर्धशतक मारले तरी मागील दोन सामन्यांत फलंदाजी ढेपाळली.
मध्यमगती गोलंदाज उमेश यादवने बऱ्यापैकी बॉलिंग केली तरी ऑफस्पिनर सुनील नरिन, सी. वरुण, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पराभवांची मालिका खंडित करायची असेल तर कोलकाता संघाला सर्व आघाड्यांवर खेळ उंचवावा लागेल.
वेळ : रा. ७.३० वा. ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…