बदलत्या वातावरणाचा भेंडी पिकाला जोरदार फटका!

  32

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाडमध्ये बदलत्या वातावरणामुळे भेंडीच्या पिकाला जोरदार फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरश: हवालदिल झाला असून भेंडी पिकाच्या एक्स्पोर्टला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भाग व आदिवासी पट्ट्यात विविध पिकाद्वारे भाजीपाला केला जात आहे; परंतु मागील दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या अगोदर मुरबाडमध्ये नामवंत म्हणजेच दुबई, अमेरिका, श्रीलंका, युरोप या देशात २०१४ ते २०१८च्या दरम्यान भेंडी पिकाला चांगला भाव मिळत होता; परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीच्या कालावधीत मुरबाडमधील भेंडी पिकाला आता ब्रेक लागला आहे.


तसेच मुरबाड तालुक्यातील कोरावळे, आबेळे (खु), वैशाखरे, शिदींपाडा, मानिवली, धसई, जामघर, शिवले, घोरले, बराड पाडा, किशोर, वांजले, यांच्यासह तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये भेंडीचे पीक घेतले जात आहे. परंतु यंदा भेंडीच्या पिकाची लागवड करण्यापूर्वीच सतत चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे यंदा भेंडी पिकाची लागवड उशिरा आहे. कारण जमिनीची मशागत दिली होती त्यावर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याने शेतकरी वर्गाला जमिनीची दुबार मशागत करावी लागली होती. त्यामुळे यंदा भेंडीच्या पिकामुळे शेतकऱ्याला फायदा नसून यंदा तोटा सहन करावा लागत आहे.


तसेच मुरबाड तालुक्यात भेंडीबरोबर मिरची, काकडी, कारली, कांदा या भाजीपाल्याची लागवड केली आहे, तसेच २००च्या आसपास उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातीकरिता ऑनलाईन नोंदणी मुरबाड कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती मुरबाड कृषी विभागाने दिली आहे.


मुरबाड तालुक्यातील प्रामुख्याने इतरही विविध भाजीपाल्याची पिके घेतली जात असली तरी भेंडीचे पीक हे नामवंत पीक असल्याने सर्वच ठिकाणी भेंडीचे पीक घेतले जात आहे; परंतु यंदा भेंडीच्या पिकाला डिसेंबर, जानेवारी दरम्यान प्रति किलो ४० रुपयाचा भाव होता; परंतु यंदा उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि राज्यस्तरावर व देश स्तरावर भेंडीच्या मार्केटला फारसा भाव मिळत नाही; परंतु यंदा मार्च, एप्रिल दरम्यान भेंडीचाच्या भावात मोठी घट झाली आहे. तो भाव प्रति किलो २० रुपये वर आले आहे. त्यामुळे अक्षरशः मुरबाडमधील शेतकऱ्यांचे भेंडीच्या पिकाबाबत फार मोठे नुकसान झाले.

Comments
Add Comment

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन

मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा होणार की नाही ?

मीरा-भाईंदर : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे ती मीरा - भाईंदरमधील कायदा आणि

कल्याणमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरुन वातावरण तापलं, शिवसेना - मनसे आमनेसाने

कल्याण : कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली.

पनवेल-कल्याण रेल्वे दिवामार्गे करण्याची गरज

डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो

केडीएमसी संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुविधांची दुर्दशा

कल्याण : टिटवाळा मांडा पश्चिमेतील मनपाच्या संत ज्ञानेश्वर शाळेचे गळके छप्पर पाहता, सोयी सुविधा अभावी शाळेची