Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडागुजरात टायटन्ससाठी ‘सुपर संडे’

गुजरात टायटन्ससाठी ‘सुपर संडे’

चेन्नईचा ३ विकेट राखून पराभव; अव्वल स्थान आणखी मजबूत

पुणे (प्रतिनिधी) : शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा तीन विकेट आणि एक चेंडू राखून पराभव करत गुजरात टायटन्सने साखळीतील पाचव्या विजयासह गुणसंख्या दहावर (डबल फिगर) नेली. तसेच गुणतालिकेतील आव्हान कायम राखले.

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि गुजरातच्या डेव्हिड मिलरने तुफानी फटकेबाजी करताना प्रेक्षकांचे मनोरंजन केले तरी ऑस्ट्रेलियन मिलरची ५१ चेंडूंतील ९४ धावांची नाबाद खेळी निर्णायक ठरली. याच्या मॅरेथॉन खेळीत ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. मिलरला हंगामी कर्णधार राशिद खानची (२१ चेंडूंत ४० धावा) चांगली साथ लाभली. गुजरातने सलग दुसरा आणि एकूण पाचवा विजय नोंदवला तरी तुलनेत माफक आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची सुरुवात निराशाजनक झाली.

सलामीवीर शुबमन गिल आणि वनडाऊन विजय शंकर खातेही उघडू शकले नाही. दुसरा सलामीवीर वृद्धिमान साहा ११ तसेच चौथ्या क्रमांकावरील अभिनव मनोहर १२ धावा काढून माघारी परतले. निम्मा संघ १३व्या षटकात ८७ धावांवर परतल्यानंतर अनुभवी डेव्हिड मिलरने सामन्याची सूत्रे आपल्याकडे घेतली. खेळपट्टीवर टिकून राहतानाच त्याने उपयुक्त खेळी केली. शिवाय गुजरातला आणखी एक विजय मिळवून दिला.

यंदाच्या हंगामात सातवा सामना खेळताना ओपनर ऋतुराज गायकवाडला सूर गवसला. त्याने ४८ चेंडूंत ५ चौकार आणि तितकेच षटकार ठोकताना ७३ धावांची चमकदार खेळी केली. त्याला केवळ अंबती रायुडूची (३१ धावांत ४६ विकेट) चांगली साथ लाभली. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले.

ऋतुराज आणि अंबती हे चेन्नईच्या मदतीला धावून आले तरी गतविजेत्यांची सुरुवात निराशाजनक झाली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या गुजरातचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सलामीवीर रॉबिन उथप्पाला ३ धावांवर माघारी धाडले. वनडाऊन अष्टपैलू मोईन अली याला (१) अल्झरी जोसेफने फार काळ टिकू दिले नाही. मात्र, गायकवाड आणि रायुडूने तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावा जोडताना चेन्नईला सुस्थितीत आणले.

स्थिरावलेले दोन्ही बॅटर परतल्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने शिवम दुबेने पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूंत ३८ धावांची नाबाद भागीदारी रचताना सुपर किंग्जना २० षटकांत ५ बाद १६९ धावांची मजल मारून दिली. गुजरातकडून सर्वाधिक २ विकेट अल्झरी जोसेफने घेतल्या.

६ सामन्यांतील पाचव्या विजयासह गुजरातने गुणसंख्या दहावर नेली. शिवाय अव्वल स्थान आणखी मजबूत केले. चेन्नईने पाचव्या सामन्यात पहिला विजय मिळवला होता. मात्र, त्यांना सातत्य राखता आले नाही. हा त्यांचा पाचवा विजय ठरला.

ऋतुराजला सूर गवसला, पण…

यंदाच्या हंगामात सातवा सामना खेळताना ओपनर ऋतुराज गायकवाडला सूर गवसला. त्याला पहिल्या सहा सामन्यांत केवळ ३९ धावा जमवता आल्या. सलामीला कोलकाताविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर लखनऊ आणि पंजाबविरुद्ध (प्रत्येकी १ धाव) तो जेमतेम खाते उघडू शकला. हैदराबाद आणि बंगळूरुविरुद्ध अनुक्रमे १६ आणि १७ धावा केल्या तरी मोठी खेळी करण्यात अपयश आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -