पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा जाहीर केला असून ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा त्यांनी रविवारी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. या घोषणे नंतर राज यांच्या हिंदुत्वाच्या मुद्याभोवती राजकीय वर्तुळात चर्चेला जोर येणार आहे.
दरम्यान अयोध्येला जाणार असल्याची घोषणा यापूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील केली आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली.
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भोंग्याच्या विषयावर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी, भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक असल्याचे म्हटले.
तर या देशातील सुप्रीम कोर्ट, कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का, असा सवालही राज यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे आगामी जाहीर सभा ही महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी औरंगाबाद येथे घेणार असल्याची घोषणा देखील या पत्रकार परिषदेत केली.
छत्रपती संभाजीनगर : जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली…
दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीने आरसीबीला विजयासाठी धावांचे आव्हान दिले आहे.…
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली…
नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…
मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…