गुजरात, चेन्नई आमने-सामने

  61

नवी मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील संडे स्पेशल (१७ एप्रिल) लढतीत गुजरात टायटन्ससह गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज सातत्य राखण्यास उत्सुक आहे.


गुजरातने पहिल्यावहिल्या हंगामात विजयाच्या हॅट्रिकसह पाच सामन्यांत चार विजय मिळवलेत. हैदराबादने त्यांचा विजयी वारू रोखला. मात्र मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सला हरवत केन विल्यमसन आणि सहकारी पुन्हा विजयीपथावर परतले.


चेन्नईसाठी १५व्या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली. रवींद्र जडेजा आणि कंपनीवर ओळीने चार पराभवांची नामुष्की ओढवली. कोलकाता, लखनऊ सुपर जायंट्स असो किंवा पंजाब, हैदराबाद. केवळ पराभव पाहावा लागला. मात्र बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध चेन्नईची सांघिक कामगिरी फळाला आली. गतविजेत्यांनी अखेर गुणांचे खाते उघडले. आता त्यांच्यासमोर सातत्य राखण्याचे आव्हान आहे.


कर्णधार हार्दिक पंड्यासह शुभमन गिलचा फॉर्म गुजरातसाठी जमेची बाजू ठरली आहे. मात्र डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मॅथ्यू वॅडे, विजय शंकर, मनोहर यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. गोलंदाजीतही लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमी वगळता अन्य बॉलर्सना प्रभाव पाडता आलेला नाही. प्रतिस्पर्धी चेन्नई संघ अपेक्षित फॉर्मात नसला, तरी गुजरातला त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.


चेन्नईची भिस्त शिवम दुबेसह रॉबिन उथप्पावर आहे. त्यांचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड, कर्णधार रवींद्र जडेजासह अंबाती रायुडू, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ड्वायेन ब्राव्हो अद्याप फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. गोलंदाजीत ब्राव्हो वगळता अन्य बॉलर फ्लॉप ठरलेत. त्यामुळे विजयी कामगिरीत सातत्य राखायचे असेल, तर चेन्नईला सर्व आघाड्यांवर खेळ उंचवावा लागेल.


वेळ : रा. ७.३० वा. ठिकाण : एमसीए स्टेडियम, गहुंजे

Comments
Add Comment

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन

N C Classic: नीरज चोप्राने एनसी क्लासिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक, घरच्या मैदानावर दमदार कामगिरी

बेंगळुरू: शनिवारी बेंगळुरूमधील श्री कांतीरवा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत

IND vs ENG: कर्णधार शुभमन गिलची बॅट पुन्हा एकदा गरजली, आता दुसऱ्या डावातही शतक झळकावले

महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा ५४ वर्षांचा जुना विक्रम मोडला  बर्मिंगहॅम: एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडविरुद्ध

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले

मुंबई : भारत आणि बांगलादेश या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन

पराभवाची चाहूल लागताच संतापला इंग्रज, DRS वरुन पंचांवर भडकला बेन स्टोक्स

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला

IND vs ENG Test 2: तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे २४४ धावांची आघाडी

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. शुक्रवारी