पहिल्यांदाच दोन शिफ्टमध्ये होणार नाल्यांची सफाई

  54

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. दरम्यान निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रातील सुमारे तीनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या नाल्यांची आणि नद्यांची पावसाळा-पूर्व साफसफाई अधिक योग्य प्रकारे व वेळेत व्हावी, यासाठी नालेसफाईची कामे ही दरवर्षीप्रमाणे एका शिफ्टमध्ये न करता यंदा प्रथमच दोन पाळ्यांमध्ये करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.


नालेसफाईच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याचेही चहल यांनी सांगितले. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी व निर्धारित ठिकाणी गाळ टाकण्यापूर्वी; गाळाचे वजन करण्यासह दोन्ही वेळी व्हिडीओ छायाचित्रण देखील करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


गुरुवारी महापालिका आयुक्तांनी केलेल्या नालेसफाई पाहणीवेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, संबंधित उपायुक्त उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. दरम्यान चहल यांनी सर्वप्रथम मिठी नदीतील साफसफाई कामांसह संबंधित कामांची पाहणी केली. या अंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील 'बीकेसी कनेक्टर ब्रिज' नजिकच्या 'कॅनरा बँक' कार्यालयासमोरील मिठी नदी येथे सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली.


यानंतर त्यांनी धिरुभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने सुरू असलेल्या साफसफाई कामांची पाहणी केली तसेच गुरुवारच्या दौऱ्यादरम्यान वांद्रे पूर्व परिसरातील उत्तर भारतीय संघ भवन जवळ असणाऱ्या वाकोला नदीमध्ये सुरू असलेल्या साफसफाई कामांची त्यांनी पाहणी केली. तर आजच्या दौऱ्याच्या शेवटी वांद्रे पूर्व परिसरातील वांद्रे टर्मिनस नजीक असणाऱ्या वाशी नाका नाला येथील कामांची पाहणी केली. तर ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे करण्याचे आदेश दिले असले तरी १५ मे पूर्वी नालेसफाई काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.


आधीच महापालिकेवर प्रशासक नेमला असल्यामुळे नालेसफाईच्या प्रत्यक्ष कामाला उशीर लागला आहे. त्यातच पालिका आयुक्तांनी उशिरा का होईना नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आहे. भाजपने नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर अहवाल सादर केला होता. त्यानंतर गुरुवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर