साईबाबा सर्वधर्म समभाव मानत असत. सर्व भक्तांना श्रद्धा, सबुरी, प्रेम, अहिंसा, सुशिक्षितपणा, गुरुप्रेम, बंधुप्रेम, मातृप्रेम, बहिणप्रेम, पितृप्रेम याबद्दल आग्रहाने सांगत. गणपती, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, कार्तिकी एकदशी, रामनवमी, हनुमान जयंती या सर्वच हिंदूंच्या सणाबद्दल साईबाबा फारच आग्रही असत. सर्वच सणवार देवभक्त जनतेने आनंदाने साजरे करावेत, असे साईबाबांचे म्हणणे असे. सणवार, जत्रा सार्वजनिक देवपूजा यामुळे जनतेमध्ये भाईचारा वाढतो. प्रेम वाढते. साई भंडाऱ्यामुळे अनेकांना अन्नदानामुळे जेवण मिळत असे.
सर्व भक्त साईंना धन्यवाद देत असत. एकवचनी, एकपत्नी रामराज्य निर्माण करणाऱ्या रामाला साईबाबा दिनरात भजत असत. तसेच मारुतीरायाला, हनुमानाला हृदयापासून मानत असत. हनुमानाची श्रीरामभक्ती, गुरुभक्ती, मातृपितृ प्रेम, बंधुप्रेम याबद्दल साईबाबांना भरपूर आदर होता. साईबाबा राम पंचायतनाबरोबरच हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाची पूजाही करत. रामनवमीनंतर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साईबाबा प्रचंड आनंदात साजरी करीत. म्हाळसापती, श्यामा देशपांडे, तर्खडकर, बुट्टीसाहेब, देशमुख साहेब या सर्वांच्या मदतीने हनुमान जयंती प्रचंड गर्दीत साजरी करीत. सर्वांना गुळखोबऱ्याचा प्रसाद सुंठवडा व नंतर भंडाऱ्याचा प्रसाद आनंदाने देत.
साई म्हणे सदा पूजावा हनुमान
सर्व सुखांचे तेच एक अनुमान ।।१।।
करू नये कधी स्वशरीराचा अपमान
धष्टपुष्ट देहाचा ठेवा मान ।।२।।
व्यायाम करूनी देहाची वाढवा शान
महाहनुमानाच्या मुर्तीवर ठेवा ध्यान ।।३।।
बलभीमापरी बनवेल शक्तीमान
जगात वाढेल आन, बान, शान ।।४।।
नको व्यसने वाईट मदिरापान
ब्रह्मचारी राहून वाढवा शान ।।५।।
हनुमानाप्रमाणे करा राम पूजन
मारुतीसवे करा सीताराम पूजन ।।६।।
जसे मारुतीने वाचविले लक्ष्मण प्राण
तसे वाचवा सर्व बंधुभगिनी प्राण ।।७।।
जैसे मारुतीने केले लंका दहन
तैसे वाईटव्यसनांचे करा दहन।।८।।
सुविचारांचे करा वहन
सुटतील प्रश्न अनेक गहन ।।९।।
साई म्हणे रामनाम साईराम ऐक
हनुमान बलभीम श्यामनाम ऐक ।।१०।।
अंजनीसूत महारुद्र सूर्यवंशी ऐक
चैत्रपौर्णिमेचा हनुमान जन्म साजरा करा नेक ।।११।।
मी स्वत: आहे हटयोगी गुरू
हनुमान माझा प्राणसखा गुरू ।।१२।।
विलास खानोलकर [email protected]