परमेश्वराचे वर्णन करताना संतांनी सांगितले की, तो अनंत आहे. त्याला आदी ही नाही व अंतही नाही. त्यानेच निर्माण केलेल्या विश्वाला ही आदी नाही व अंतही नाही. लोक म्हणतात.या विवाचा ना होईल. पण आमच्या मते विव हे चालतच राहाणार. कारण तो परमेश्वराचा आविष्कार आहे.
“जग नोहे जगदी, विव नोहे विवंभर जन नोहे जनार्दन।” आपण ज्याला जग म्हणतो ते जगदी आहे म्हणून त्याचा ना होत नाही.हा परमेश्वर सगळीकडे आहे सर्व आकार जिथून उदयाला येतात, त्याला निराकार म्हणतात. हे ज्ञानेवर महाराजांनी हरिपाठात सांगितलेले आहे. “जेथूनी चराचर त्यासी भजे”। निर्गुण निराकार असलेला परमेवर जेव्हा व्यक्त होतो तेव्हा सर्व आकार तिथून उदयाला येतात. आई एकच असते. तिची मुले वेगवेगळी असतात. जर एक आई अनेक मुलांना जन्म देते तर परमेश्वर जो अनंत आहे तो किती गोष्टींना जन्म देत असेल! चर अनंत आहे. अचर अनंत आहे. पक्षी अनंत आहेत. झाडावरची पाने मोजता येतात का? तुमच्या डोक्यावरचे केस तुम्हाला मोजता येतात का? सर्व आकार जे आहेत ते त्या निराकार तत्त्वातून उदयाला आलेले आहेत. सगळे गुण हे निर्गुण स्वरूपांतून उदयाला आलेले आहेत. परमेश्वराला खंड नाही, तो अखंड आहे.परमेश्वराला मरण नाही तो अमर आहे.
त्याला मृत्यू नांवाची गोष्टच नाही. परमेवरी तत्व जे आहे ते अजर आहे. म्हणजे ते कधी म्हातारे होत नाही. परमेश्वर, देव हा अजर आहे, अमर आहे, अखंड आहे. अजर म्हणजे काय? कधीही म्हातारा होत नाही. अमर म्हणजे काय? त्याला मृत्यू नाही. अखंड म्हणजे काय? त्याला खंड नाही. त्याला कसलीही उपाधी नाही. निर्गुण अवस्थेत त्याला कसलीही उपाधी नाही. तो सगुण अवस्थेत येतो तेव्हा सगळया उपाधींमध्ये असतो. हा निर्गुण निराकार परमेश्वर कुणीही पाहू शकत नाही कारण तो पाहण्याचा विषय नाही. आतापर्यंत कुणी पाहिलेला नाही, यापुढे पाहू शकत नाही. त्याप्रमाणे परमेश्वरी तत्त्व धरता येत नाही. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे –
चाले हे रीर कुणाचिये सत्ते, कोण बोलवितो हरीविण
ऐकवी देखवी एक नारायण,
तयाचे भजन चुको नका
माणसाची देव चालवी अहंता,
मीची एक कर्ता म्हणूनी
वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता,
राहिली अहंता मग काठे
तुका म्हणे विठो भरला सबाही,
तया उणे काही चराचर
जग ही जी सत्ता आहे हे जग कुणाच्या सत्तेने चाललेले आहे।
ज्याच्या सत्तेने हे जग चाललेले आहे तो परमेवर।
पृथ्वी स्वतःभोवती फिरते व सूर्याभोवती फिरते म्हणून
आपण जिवंत आहोत।
ऋतूचक रात्रंदिवस हे देवाच्या
सत्तेने मिळतात।
– सद्गुरू वामनराव पै