Friday, May 9, 2025

महामुंबई

वारंवार सेल्फी काढल्याने चेहरा होतो खराब

मुंबईः सेल्फीचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. लोक दर वर्षी सरासरी ४५० सेल्फी काढतात, असा निष्कर्ष आहे; परंतु एका अभ्यासानुसार यामुळे फोटोतला चेहरा खराब होऊ शकतो. ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउथवेस्टर्न मेडिकल सेंटर’मधल्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सेल्फीमुळे चेहरा विकृत होतो. नाक सामान्य फोटोंपेक्षा लांब आणि रुंद दिसतं, असं आढळून आलं आहे.


अनुनासिक शस्त्रक्रिया, ज्याला राइनोप्लास्टीदेखील म्हणतात, ही ब्रिटनमधली सर्वात लोकप्रिय कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, सेल्फीच्या लोकप्रियतेमध्ये, नासिकाशोथ करणार्यांची संख्याही वाढली आहे. सेल्फीमध्ये चेहरा खराब दिसला तर लोक शस्त्रक्रिया करण्याला प्राधान्य देतात. अभ्यासात टीमचे नेतृत्व करणारे डॉ. बर्दिया अमीरलक म्हणाले, सेल्फी आणि नासिका यांचा परस्परांशी घट्ट संबंध आहे.


या अभ्यासात सहभागी असलेल्या ३० स्वयंसेवकांनी सेल्फीचा चेह-यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. स्वयंसेवकाने समोरच्या कॅमे-यातून १२ आणि १८ इंच अंतरावरून दोन सेल्फी घेतले आणि डिजिटल कॅमेर्यातून पाच फूट अंतरावरून एक सेल्फी घेतला. हे तिन्ही सेल्फी एकत्र क्लिक करण्यात आले आहेत.


डिजिटल कॅमे-याने घेतलेल्या फोटोच्या तुलनेत १२-इंच अंतरावरून घेतलेल्या सेल्फीमध्ये नाक ६.४ टक्के लांब आणि १८-इंच अंतरावरून घेतलेल्या सेल्फीमध्ये ४.३ टक्के लांब दिसते. १२ इंच अंतरावरील सेल्फीमध्ये हनुवटीची लांबीदेखील सरासरी १२ टक्के कमी असल्याचं आढळलं. यामुळे नाक आणि हनुवटीच्या लांबीच्या प्रमाणात १७ टक्के वाढ झाली. सेल्फीमध्ये वाईट दिसल्याने मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

Comments
Add Comment