Friday, May 9, 2025

रायगड

कर्जतमध्ये उन्हाचा कहर वाढला

कर्जतमध्ये उन्हाचा कहर वाढला

ज्योती जाधव


कर्जत : उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. हवामान विभागानेही अनेक शहरांमध्ये अलर्ट जारी केला आहे व नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. या भयानक उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून लोक कूलर, पंखे आणि एसी खरेदी करण्याकडे भर देत असून त्यात थंड यंत्रसामुग्रीचे दर गगनाला भिडले आहे.


उन्हाळ्याच्या तोंडावर बाजारात मोठ्या प्रमाणात कुलर, फ्रीज व एसीची विक्री होत असते. या वर्षीच्या हंगामात आधीच कोरोनामुळे फटका बसल्यानंतर कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून राहावे लागत असल्याने या वस्तूंच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.


उन्हाळ्यात शहरामध्ये डेझर्ट कुलर व ब्रँडेड कुलरची मागणी वाढत आहे. त्यामध्ये कॉपरचे दर वाढले आहेत. तसेच लोखंडाचे दरही वाढले आहेत. त्याचा फटका बाजाराला बसला आहे. कूलरमध्ये असलेल्या मोटारीच्या किमती वाढल्या आहेत. तसेच मजुरीचे दरदेखील वाढल्याने किंमत वाढीशिवाय पर्याय नाही.


मुळातच कोरोनाच्या धास्तीने बाजार विस्कळीत झाला आहेत. त्यात पुन्हा ग्राहकही अद्याप कमीच आहे. मात्र, उन्हाच्या चटक्यांसोबत कूलरची खरेदी वाढणार आहे. एसीच्या बाबतीतही भाव वाढले आहेत. किमतीमध्ये १० टक्के वाढ झाली आहे. फ्रीजच्या बाबतीत महागाईचा फटका बसला आहे. कॉम्प्रेसरच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने उकाड्याचा सामना करावा लागत असल्याचे पाहून पालकवर्ग घर थंड कसे राहील यासाठी एसी, कूलर घेण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. एसीचे दर ४० हजारांच्या पुढे दर गेल्याने काहींनी कूलरला पसंती दिली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दुकानदारांचा व्यवसाय जोरात सुरू आहे.


उन्हाच्या झळांमुळे नाईलाजाने एसी, कुलर खरेदी कारावी लागत आहे. तथापि, त्यांचे दर खूप वाढले आहे.


- ऐश्वर्या खातू, ग्राहक

Comments
Add Comment