म्हणून टीम इंडियाची जर्सी निळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदी सांघिक खेळ असो किंवा बॅटमिंटन, टेनिस, स्क्वॉश आदी क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा निळाच असतो. हॉकी व फुटबॉलमध्ये होम-अवे या नियमांमुळे पांढऱ्या रंगाची जर्सी घातली जाते; परंतु त्यांच्या मुख्य जर्सीचा रंग हा निळाच राहिलेला आहे.


जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय संघ केवळ निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानावर उतरतो. भारतीय संघाच्या जर्सीसाठी याच रंगाची निवड का करण्यात आली? केशरी, हिरवा किंवा पांढरा हे तिरंग्यातील रंगांपैकी एकाची निवड का केली गेली नाही, याची उत्तरे जाणून घेणार आहोत. सुरुवातीला क्रिकेट असो किंवा अन्य खेळ यांची जर्सी ही पांढऱ्या रंगाचीच होती. पण टीव्ही चॅनेल्स सुरू झाले आणि ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना जाऊन क्षणचित्र रंगीत स्वरूपात दिसू लागले. त्यानंतर खेळांमध्येही बदल होत गेले.


केशरी रंग हा शौर्याचा प्रतीक आणि हिरवा रंग आनंदाचे प्रतीक, तर पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. तिरंग्यातील कोणताही रंगाचा जर्सीसाठी विचार केला असता तर त्याचा संबंध धर्माशी जोडला गेला असता आणि त्यावरून राजकारण तापले असते. केशरी हा हिंदू, जैन व बौद्धांचा किंवा काही राजकीय पक्षोचा, हिरवा हा मुस्लीम समुदायाचा असा तेव्हा विचार केला गेला असावा. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याची प्रचिती देणारा रंगच जर्सीसाठी हवा होता.

Comments
Add Comment

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा

कांगारूंनी भारतीय महिलांचा उडवला धुव्वा!

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिला संघाला पूर्णपणे

नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे.

अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून