पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना?

  65

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. गृहमंत्र्यांनी याची पाळंमुळं शोधून काढावीत अशी मागणी करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपावर हल्लाबोल केला. राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. "पवारांच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? विरोधी पक्षाचा हा दळभद्रीपणाचा कळस आहे. सदावर्तेंना भाजपाचा पाठिंबा असून त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठीच ठेवलेलं आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला.


संजय राऊतांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज आहे, असं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. "संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय आहे. त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली त्यामुळे ते नैराश्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्यावरच लक्ष ठेवावं. पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना? याची चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे", असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.


"संजय राऊत राज्याच्या पोलिसांनाच बुळचट म्हणतात मग तुमचंच सरकार आहे. तर पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निलंबित करण्याची धमक तुम्ही दाखवणार का?", असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.


"राज्यातील विरोधी पक्षाचा दळभद्रीपणाचा कळस केला आहे. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? भाजपाचा नवनिर्माण केलेला नेता सदावर्ते याला भाजपाचा पाठिंबा आहे. तो कुठे राहतो. कुणाच्या घरात राहतो. त्याला आर्थिक पाठबळ कुणाचं आहे. त्याला फक्त पवार, ठाकरेंविरोधात गरळ ओकण्यासाठीच ठेवलेलं आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


"आता जे आंदोलक रेल्वे स्टेशनला बसलेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे एकाच वेळेला प्लॅटफॉर्म तिकीट कसे आले. कोणती यंत्रणा काम करतेय? महाराष्ट्रात तुम्हाला काय घडवायचं आहे? एसटी कर्मचाऱ्यांप्रती आम्हालाही सहानुभूती आहे. शिवसेना नेहमीच कष्टकऱ्यांच्या बाजूनं उभे राहत आली आहे. पण त्यामागून महाराष्ट्राला बदनाम करण्याची कट-करस्थानं रचली जात आहेत. याचं पाप तुम्ही कुठं फेडणार आहात?", अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर