सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला झाल्यानंतर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी हे सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधीही चर्चा झाली.


महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला लक्ष्य केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी धडक कृती सुरू केली आहे. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तिथून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. या सगळ्या घटनांनंतर आता पवारांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री-गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत पवारांच्या घरावरील हल्ल्यासंदर्भात माध्यमांना माहिती होती, ती पोलिसांना का नव्हती? असा थेट प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नावर मुंबई पोलिस आयुक्तांनी सारवासारव केली.


शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील सिल्व्हर ओकवर देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्या आहेत. दुसरीकडे पवारांचे बारामतीमधील निवासस्थान गोविंदबागेची सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी पुणे पोलिस अधिक्षकांना दिल्या आहेत. बारामतीचे पोलिस उपअधिक्षक आणि पोलिस निरिक्षकांनी गोविंदबागेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, शरद पवार शनिवारी साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. तर उद्या रविवारी शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्या दिमतीला कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय