मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असते, तर नालेसफाईसाठी दरवर्षी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र तरीही मुंबईतील नाल्यांमध्ये गाळ साचून राहिला म्हणून पूरपरिस्थिती येतेच. दरम्यान यंदा भाजप नालेसफाईसाठी आक्रमक झाली आहे. आतापर्यंत मुंबईत नालेसफाईची कामे सुरू व्हायला हवी होती. मात्र महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतरही नालेसफाईच्या कामाला वेळ लागल्यामुळे भाजप नालेसफाईबाबत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते.
शुक्रवारी मुंबईतील पूर्व उपनगरात भाजपच्या नालेसफाई पाहणी दौऱ्याला सुरवात होणार आहे. यात मुलुंड पश्चिम रेल्वे स्टेशन नाला सिटी ऑफ जॉयजवळ, रामगड नाला, भांडुप वैभव चौक नाला, एपीआय नाला आणि उषानगर नाला भांडुप पूर्व, ऑक्सिजन नाला, घाटकोपर लक्ष्मीनगर, लक्ष्मी बाग नाला या नाल्यांची पाहणी केली जाणार आहे.