Thursday, July 3, 2025

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावरून हुसकावले, सीएसएमटी स्थानकात ठिय्या

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावरून हुसकावले, सीएसएमटी स्थानकात ठिय्या

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. त्यानंतर घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे ॲड. गुणवंत सदावर्ते यांना अटक करण्यात आले, तर दुसरीकडे मध्यरात्री आझाद मैदानावरून पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढले.


त्यानंतर जमावाने बाजूला असलेल्या सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला. असे होऊनही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आपल्याला पोलिसांनी बळजबरीने आझाद मैदानातून हुसकावल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा