नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतावरही होऊ लागला आहे. एअर इंडियाने दिल्ली ते मॉस्को विमानसेवा रद्द केली आहे. एअर इंडियाची विमाने आठवड्यातून दोनदा दिल्लीहून मॉस्कोला जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा संरक्षण न मिळाल्याने एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याशिवाय, ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट काढलेलं आहे त्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे रशियाकडे उड्डाण करणाऱ्या विमानांना जास्त धोका आहे, त्यामुळे विमानांना विमा संरक्षण मिळत नाही.
रशियन दूतावासाने सांगितले की, प्रिय नागरिकांनो, भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने दिल्ली-मॉस्को-दिल्ली मार्गावरील तिकिटांची विक्री बंद केली आहे, याकडे आम्ही आपले लक्ष वेधतो. या विमान कंपनीची रशियाला उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता सध्या अनिश्चित आहे. एअर इंडियाच्या कार्यालयानुसार प्रवाशांना रद्द केलेल्या विमानांसाठीचा पूर्ण परतावा मिळण्याचा हक्क आहे.
तथापि, रशियन दूतावासाने सांगितले की ताश्कंद, इस्तंबूल, दुबई, अबू धाबी, दोहा आणि इतर मार्गांद्वारे दिल्ली ते मॉस्कोपर्यंत उड्डाण करणे अद्याप शक्य आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): आज जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार…
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…
पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…
एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…