Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

आज रात्रीपासून टोल महागणार!

आज रात्रीपासून टोल महागणार!

नवी दिल्ली : एनएचएआयने राष्ट्रीय महामार्गांच्या टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासूनच टोलच्या दरात ही वाढ होणार आहे. मध्यरात्री १२ वाजल्यापासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलच्या दरात १० ते ६५ रुपयांची वाढ केली आहे. छोट्या वाहनांसाठी १० ते १५ रुपये तर व्यावसायिक वाहनांसाठी ६५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.


ही दरवाढ देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर केली जाणार आहे. म्हणजे जर एखाद्या टोल नाक्यावर १०० रुपये टोल असेल तर तो १ एप्रिल २०२२ पासून ११० रुपये किंवा ११५ रुपये होणार आहे. महाराष्ट्रात अद्याप किती टोलवाढ केली जाईल याची माहिती आलेली नाही. परंतू दिल्लीपासून तामिळनाडू, केरळपर्यंत टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.


याआधी पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झालेली असताना आता टोलच्या दरात मोठी वाढ झाल्याने वाहने ठेवायची की विकायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Comments
Add Comment