११ लाखांची पैठणी पाहायची उत्सुकता - आदेश बांदेकर

  92

मुंबई : होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन सन्मान केला आहे. या कार्यक्रमाचं नवीन पर्व ''महामिनिस्टर''ची नुकतीच घोषणा झाली आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. कारण या पर्वात आदेश भाऊजी चक्क ११ लाखांची पैठणी महाविजेत्या वहिनीला देणार आहेत. या ११ लाखांच्या पैठणीची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात आहे.


याबद्दल आदेश बांदेकर यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या १८ वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्ये देखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आणि यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि ११ लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस रंगेल. हि ११ लाखांची पैठणी कशी असेल हि पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे, त्यामुळे महामिनिस्टर या नवीन पर्वासाठी मी देखील खूप उत्सुक आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल