नवाब मलिकांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची होणार चौकशी

मुंबई (प्रतिनिधी): मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने आता त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांची माहिती मुंबई उपनगरच्या रजिस्ट्रारकडे मागितली आहे. यासंबंधी रजिस्ट्रारशी पत्रव्यवहारही केला आहे. नवाब मलिक, त्यांची पत्नी, मुलगा फराज यांच्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तांसंबंधीची कागदपत्रे देण्यात यावीत, असे पत्रात नमूद केले आहे. ईडीने २४ मार्च रोजी हे पत्र पाठवले होते. दरम्यान, ईडीने यापूर्वी मलिक कुटुंबीयांकडे दस्तावेज मागितले होते. मात्र, ते न मिळाल्याने आता ईडीने रजिस्ट्रारकडे ही मागणी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.


मलिक यांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर कोठडीत बिछाना, खुर्ची आणि घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचा अर्जही मलिक यांनी कोर्टात केला होता. त्यावर कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य करण्यात आली. तर घरचे जेवण मिळण्याबाबत मलिक यांचा वैद्यकीय अहवाल बघून निर्णय देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी