'आता मुंबईकरांकडून पण ही 'वसूली' करणार का?'

मुंबई : एक एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा १४ टक्के अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.


'मुंबई महापालिकेतील 'माजी' कारभाऱ्यांनी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही अशा फुशारक्या मारल्या. मग प्रशासक बसताच मालमत्ता करात वाढ कुठून आली? प्रशासकाच्या आडून हे करायचे ठरलं होत का?,' असा सवाल शेलार यांनी केला आहे.


तसंच, 'महापालिकेवर प्रशासक बसला असला तरी राज्याच्या सत्तेच्या खुर्चीत तुम्हीच बसला आहात ना? करोनामुळे मुंबईकरांचे अर्थकारण बिडलेय हे दिसतेय ना? काही मदत करु शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका! आता मुंबईकरांकडून पण ही "वसूली" करणार का?,' असा संतप्त सवाल शेलार यांनी केला आहे.


दरम्यान, प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता कर वाढवण्यात येतो. यापूर्वी सन २०१५ मध्ये करवाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२०मध्ये कर वाढवण्यात येणार होता. मात्र करोनामुळे करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला. २०२१मध्ये पुढील चार वर्षांसाठी म्हणजे २०२५पर्यंत पालिकेने मालमत्ता करवाढीचा निर्णय घेतला होता. सध्याच्या रेडीरेकनर दरानुसार ही वाढ करण्यात येणार होती. ही करवाढ सुमारे १४ टक्के इतकी अपेक्षित असून त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात सुमारे एक हजार कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

आजपासून धारावीकरांसाठी विशेष मोहीम

प्रलंबित सर्वेक्षणात भाग घेता येणार १५ नोव्हेंबरपर्यंत मोहीम राबविली जाणार मुंबई  : विविध अन्य कारणांमुळे

शाळेत तिसरीपासूनच ‘एआय’चे धडे

मुंबई  : केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल

Mumbai Local : प्रवाशांनो, बाहेर पडण्यापूर्वी पाहा! मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीसाठी 'मेगा ब्लॉक'; कोणत्या गाड्या रद्द, कुठे वळवल्या? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

मुंबई : मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रेल्वेच्या मध्य (Central), हार्बर (Harbour) आणि पश्चिम (Western) या तिन्ही

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील