फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात ३०० कोटींची ऑफर

  70

जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर 'लाच' दिल्याच्या आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनानं सीबीआयकडं या प्रकरणाच्या चौकशीची शिफारस केली आहे.


सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना युनियन आणि बड्या औद्योगिक घराण्यांच्या फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात 300 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार देत सौदे रद्द केले होते, असं मलिकांनी नमूद केलंय.


मलिकांनी सांगितलं होतं की, मी जम्मू-काश्मीरचा राज्यपाल झालो, तेव्हा माझ्याकडं दोन फाईल्स आल्या होत्या. एका फाईलमध्ये अंबानींचा समावेश होता, तर दुसरी आरएसएसचा वरिष्ठ अधिकारी आणि मेहबुबा सरकारमधील एका मंत्र्याशी संबंधित होती. हे नेते स्वत:ला पंतप्रधान मोदींचे जवळचे म्हणवायचे. ज्या विभागांच्या या फायली होत्या, त्यांच्या सचिवांनी या फायलींमध्ये गडबड असल्याचं सांगितलं होतं आणि सचिवांनीही त्यांना या दोन्ही फायलींमध्ये 150-150 कोटी रुपये मिळू शकतात, अशी ऑफर दिली होती; पण मी या दोन फायलींशी संबंधित करार रद्द केला, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत.

Comments
Add Comment

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी

Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली

शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील

PM Modi Award List : ११ वर्षांत २५ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचा सन्मान; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाना या देशाने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी

अमरनाथ यात्रा मार्गावर भीषण अपघात: ५ बस एकमेकांवर आदळल्या, ३६ यात्रेकरू जखमी!

जम्मू: अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन

Grand Chess Tour 2025 : गुकेशची कमाल! कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं अन् गुकेशनं त्याच्याचं नाकावर टिच्चून 'रॅपिड' स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं

नवी दिल्ली : क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता