मुंबई : राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा आज केली. तर आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यात आला आहे.
नव्या निर्णयानुसार आता आमदारांना स्थानिक विकासासाठी पाच कोटी रुपये दिले जातील. या निधीतून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासाची कामे करता येणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधानपरिषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे.
“महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादीला जास्त निधी दिला जातो आणि शिवसेना काँग्रेसला कमी निधी दिला जातो, असा विरोधकांनी आरोप केला आहे. परंतु, हा निधी कोणत्याही एका वैयक्तीक पक्षाचा नसतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे. यात विविध पक्षाचे मंत्री होते. तसंच आमचंही तीन पक्षाचं सरकार आहे. निधी देत असताना पक्ष पाहिला जात नाही,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…