पंजाबमध्ये ‘आप’चे वर्चस्व

Share

अमृतसर : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे आता स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल आणि भाजपला जोरदार धक्का दिल्याचे चित्र दिसत आहे.

गेली दीड वर्ष पंजाब शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मात्र पंजाबच्या मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. येथे ‘आप’ने मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस फक्त १३ जागांवर आघाडीवर आहे. अकाली दल आणि भाजप यांना दुहेरी संख्या अद्याप गाठता आलेली नाही.

राज्यातील दिग्गज नेते पिछाडीवर असून यात मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिंह सिद्धू आणि सुखबीर सिंह बादल यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पटियाळा शहरातून १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या ठिकाणी आपचे अजीत पाल सिंग कोहली यांनी आघाडी घेतली आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह भदौड आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदार संघातून पिछाडीवर आहेत. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील पिछडीवर आहेत. अमृतसर ईस्ट विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे नवज्योत सिंह सिद्धू तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Recent Posts

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

32 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

9 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

10 hours ago