तारापूर औद्योगिक वसाहतीमधील निर्भया रसायन कारखान्याला भीषण आग

  131

बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील निर्भया रसायन या कारखान्याला लागलेल्या आगीत कारखाना जळून खाक झाला आहे. मंगळवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेच्या दरम्यान आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर बुधवारी पहाटे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.


दरम्यान, कारखान्याला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारखान्याला लागलेल्या आगीच्या ज्वाळा आणि धूर काही किलोमीटर अंतरावरून दिसून येत होता. दरम्यान, प्रसंगावधान राखत कारखान्यातील २१ कामगार कारखान्यातून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली टळली. तथापि, कारखान्याचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.


तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लाट क्रमांक एन ९६ मधील निर्भया रसायन प्रा. लि. कारखान्यात सीपीसी ब्लू डाईज नावाचे रसायनाचे उत्पादन घेतले जाते. मंगळवारी (दि. ८ मार्च) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना कारखान्याला भयानक आग लागली होती. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाचे तीन बंब, भाभा अणुशक्ती केंद्र आणि पालघर नगर परिषदेचा एक मिळून पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर पहाटे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Comments
Add Comment

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक