राजापुरातील रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे!

Share

राजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रविवारी राजापुरात आयोजित करण्यात आलेल्या समर्थन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा एकमुखी निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. तसा सर्वपक्षीय एकमुखी ठराव पारित करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचा संकल्प या मेळाव्यात सोडण्यात आला. राजापूर तालुक्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा होऊन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, हा समर्थकांचा आवाज शासनापर्यंत अधिक जोमाने पोहोचविण्यासाठी रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती राजापूरच्या वतीने राजापूर शहरातील यशोदिन सृष्टी सभागृहात प्रकल्प समर्थकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्वपक्षीय समर्थन मेळाव्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील स्थानिक जनतेबरोबरच राजापूर तालुक्याच्या पूर्व भागापासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या सर्व गावांतील रिफायनरी समर्थकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती. दुपारी दोन वाजल्यापासून प्रकल्प समर्थन मेळावास्थळी समर्थकांनी गर्दी केली होती. तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहत समर्थन करत धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा नारा दिला.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

7 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

32 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

40 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

1 hour ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago