Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीनवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज, सोमवारी मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मलिकांची रवानगी आता ऑर्थर रोड तुरुंगात होणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टाने १३ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. मलिक यांची ही कोठडी ७ मार्च रोजी संपत असल्याने त्यांना पुन्हा मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी ईडीने मलिक यांची सुमारे ८ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली होती. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकर याची बहिण हसिना पारकर आणि नवाब मलिक यांचा संबंध आहे. नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक हे नवाब मलिक आहेत. डी गँगशी संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. या प्रकरणी सर्व पुरावे न्यायालयात मांडण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -