वुहान, चीन : कोरोनानो जगात शिरकाव केल्याला आता दोन वर्ष झाली. अनेक देशांत कोरोनाचा प्रभाव कमी झालेला दिसून येतोय. याच दरम्यान चीनमधून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. चीनच्या ज्या शहरात कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता त्याच वुहान शहरात कोरोना पुन्हा एकदा जोर धरताना दिसून आला आहे. गेल्या २४ तासांत वुहानमध्ये कोरोनाचे ५२६ रुग्ण आढळून आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या दोन वर्षांतील एका दिवसाच्या संक्रमणाचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे.
चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, समोर आलेल्या ५२६ रुग्णांपैंकी २१४ रुग्णांत कोरोनाची स्पष्ट लक्षणो आढळून आली. मात्र, ३१२ रुग्ण असे होते ज्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणो आढळून आली नाहीत.
दिलासादायक गोष्ट म्हणजे, गेल्या २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोना संक्रमितांच्या आकड्यात झालेल्या वाढीनंतर नागरिकही सतर्क झालेले दिसून येत आहेत.
२४ तासांत कोरोनाच्या ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं चीनच्या ‘कोव्हिड झिरो धोरणा’ला जोरदार झटका बसल्याचं मानलं जात आहे.
वुहानमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत संक्रमित आढळून आल्यानंतर चीनच्या शांघाय, कवान्डांगसहीत अनेक शहरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि कोविड नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.