मुंबई (प्रतिनिधी) : गेले काही दिवस थंडीने कुडकुडलेल्या महाराष्ट्राला आता रखरखीत उन्हाचे चटके बसू लागले असतानाच हवामानात होत असलेल्या स्थित्यंतरामुळे राज्यातील बहुतांश भागांना येत्या सोमवारपासून पुढील तीन दिवस मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसासोबतच सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने रब्बीच्या पिकांवर अस्मानी संकटाचे सावट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांपुढे गेला आहे. जळगाव जिल्ह्याचा पारा देखील ३६ अंश इतका आहे. त्यामुळे उन्हाचा चटका बसू लागला आहे. मात्र अशातच सोमवारपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यासह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे.
राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांपुढे गेला आहे. जळगाव जिल्ह्याचा पारा देखील ३६ अंश इतका आहे. त्यामुळे उन्हाचा चटका बसू लागला आहे. मात्र अशातच सोमवारपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यासह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. रब्बी हंगामातील गहू, तूर, हरभरा या पिकांची काढणी सुरू असताना व कोकणासह राज्यातील बहुतांश भागात आंब्याला मोहोर आलेला असतानाच हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेली असताना व अनेक भागांत पिकांची काढणी अद्याप झालेली नसल्याने या पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा धास्तावला आहे. सोमवारी ७ मार्च रोजी औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये ढगाच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…