Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकोषाणे-वावे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे तीन तेरा

कोषाणे-वावे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे तीन तेरा

दोन महिन्यांपासून काम बंदच

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील कोषाणे येथून वावेकडे जाणारा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनवला जात आहे. तथापि, साडेतीन कोटींचा निधी मंजूर असलेल्या या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून गेले दीड-दोन महिने रस्त्याचे कामच बंदच आहे. दरम्यान, रस्त्याचे काम बंद असल्याने कोषाणे गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्यातील कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर कोषाणे गावाला जोडणारा रस्ता आणि तेथून वावे गावाला जोडणारा रस्ता अनेक वर्षे खड्ड्यांत हरवला होता. २०२१ मध्ये कोषाणे गावाला जोडणारा आणि तेथून रेल्वे मार्गाच्या पलीकडे असलेल्या वावे गावाला जोडणारा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून तयार करण्याचा निर्णय झाला. आशियाई विकास यंत्रणेच्या अर्थ सहाय्यतामधून साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आणि कोषाणे ते वावे या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत हा रस्ता पूर्ण करायचा असून दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी तब्बल साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

नवी मुंबई येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीने या कामाचा ठेका मिळवला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या नियमानुसार कोषाणे येथून वावे गावात जाणार रस्ता तयार करण्याच्या कामाला ठेकेदार कंपनीने पावसाळ्यात सुरुवात केली. ठेकेदार कंपनीने या रस्त्याचे काम करताना मुंबई-पुणे रेल्वे मार्गाच्या हद्दीत असून वावे गावाकडे जाणारा रस्त्याचे काम सुरू केले आणि साधारण ५०० मीटर लांबीचा रस्ता तयार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गेली अनेक दिवस रस्त्याचे कामच बंद आहे. त्यामुळे जुन्या खड्डेमय रस्त्यातून वाट काढत ग्रामस्थ रस्ता पार करत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

कोषाणे ते वावे रस्त्याचे काम काही महिने थांबले आहे. कारण गेली अनेक वर्षे आम्ही सर्व खड्डेमय रस्त्यातून जात आहोत. त्यामुळे आम्हाला हा रस्ता चांगल्या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे. त्यात हा रस्ता अनेक वर्षे टिकावा यासाठी आम्ही लक्ष देत आहोत. रस्त्याचे काम थांबल्याने आम्ही पनवेल येथे जाऊन महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणेला पत्र देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. – रामदास शेलार, विभागीय चिटणीस, शेकाप, उमरोली विभाग

या रस्त्याच्या प्रकल्पासाठी आशियाई बँकेचे अर्थसहाय्य मिळाले आहे. मात्र गेले काही महिने या बँकेकडून आमच्या प्रकल्पावर अर्थसाहाय्य मिळाले नसल्याने कामे मंदगतीने सुरू आहे. – राहुल चौरे, शाखा अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -