मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपणार आहे. त्याच दिवशी स्थायी समितीची शेवटची सभा होणार आहे. या सभेत कोणते प्रस्ताव मंजूर होतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
७ मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपणार असून त्याच दिवशी म्हणजे सोमवार ७ मार्च रोजी स्थायी समितीची शेवटची सभा होणार आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एकूण १७९ प्रस्ताव मांडण्यात आले होते. एवढे प्रस्ताव सभेत असल्याने भाजपकडून विरोध केला, तर बुधवारी झालेल्या स्थायी समितीत १७९ मधील ९५ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत.
सोमवार ७ मार्चला होणाऱ्या स्थायी समितीत हे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. काही प्रस्तावात कामातील खर्चाची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे ७ मार्चला कोणते प्रस्ताव मंजूर होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.