आत्मनिर्भर भारताद्वारे भारतीय उत्पादने जगभरात पोहोचतील: डॉ. मनसुख मंडवीया

  67

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मंडवीया यांनी “इंडस्ट्री कनेक्ट 2022: उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील एकत्रित ऊर्जा” या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन केले.


या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री मांडवीया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोविड-19 महामारीचे परिणामकारक व्यवस्थापन केले आहे. ते पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी वैज्ञानिक आणि वैद्यकीय समुदायाला सर्व प्रकारचा पाठींबा दिला आहे त्यामुळे भारत आता लस संशोधनाच्या बाबतीत इतर विकसित देशांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभा राहील याची सुनिश्चिती झाली आहे.


केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलताना कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये अभिनव संशोधन आणि तंत्रज्ञानाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले तसेच संशोधन, नवोन्मेष आणि शिक्षण यांना चालना देण्यासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. नाविन्यपूर्ण संशोधनाविषयी आस्था आणि दर्जेदार उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ चे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असे देखील त्यांनी सांगितले.


अत्यंत उत्तम दर्जाची भारतीय उत्पादने जगभरात सर्वदूर पोहोचतील आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच भारताच्या आर्थिक भरभराटीसाठी मोठे योगदान देतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्यावर या परिसंवादात चर्चा होईल असा विश्वासही केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी या प्रसंगी व्यक्त केला. केंद्रीय रसायने आणि खते तसेच केंद्रीय नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा देखील या वेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची