नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाच्या परिसरात असलेले नयनरम्य मुघल उद्यान १६ मार्चपर्यंत सामान्य लोकांना पाहण्यासाठी काही काळासाठी खुले करण्यात आले आहे. यानुसार तासांच्या सात पूर्व आरक्षित वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या उद्यानामध्ये जाता येणार आहे. यासाठी शेवटच्या प्रवेशाची वेळ सायंकाळी ४ असणार आहे. या प्रत्येक स्लॉटमध्ये एकावेळी जास्तीत जास्त ३०० व्यक्ती सामावू शकतात.
मुघल उद्यानामध्ये येणा-या लोकांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी त्यांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असून मास्क न वापरणा-या व्यक्तींना प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही.
नागरिकांनी मुघल उद्यानात प्रवेश करण्यासाठी https://rashtrapatisachivalaya.gov.in किंवा https://rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx संकेतस्थळावरून आरक्षण करावे.
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून आरक्षणाशिवाय थेट प्रवेश देण्यात येणार नाही. राष्ट्रपती भवनाला लागून असलेल्या नॉर्थ अॅव्हेन्यूच्या प्रवेशव्दार क्रमांक ३५ मधून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे तसेच तिथूनच त्यांना बाहेर पडता येणार आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…