नालासोपारा (वार्ताहर) : शनिवारी सकाळी १० च्या सुमारास वसई पूर्व नवघर येथील एका गारमेंट कंपनीच्या गोदामला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यात पालिकेच्या अग्नीशमन विभागाला यश आले आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, गोदामातील सर्व माल जळून खाक झाला आहे. आगीचे नमके कारण कळले नसले तरी शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन विभागाने वर्तवला आहे.
वसई पूर्व नवघर येथे असलेल्या व्हिक्टोरी रेडिमेट शर्ट बनवण्याच्या कंपनीत पहिल्या मजल्यावर गाळा क्रमांक ८ येथे सकाळी अचानक धूर निघू लागल्याने कामगारांनी वसई-विरार महालिकेच्या अग्निशमन विभागाला आग लागल्याची वर्दी दिली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोहचपर्यंत स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही क्षणांतच आगीचा भडका उडल्याने सदराची इमारत रिकामी करण्यात आली. अग्निशमन विभागाने तीन पाण्याचे बंब आणि १२ जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…