कीव : रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जागतिक अशांतता पसरली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात ठराव पारित करण्यात आला. याला एकूण सदस्यांपैकी भारत, चीन आणि संयुक्त अमिरातीने पाठिंबा दर्शवला नाही. या तिनही देशांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र, आता नाटो देशांनी युक्रेनला सहकार्य करण्यावर संमती दर्शवली आहे. युक्रेनला तत्काळ लष्करी मदत पोहोचवण्याची तयारी सुरू असून पहिल्या टप्प्यात नेदरलँडने २०० अँटी एअरक्राफ्ट मिसाईल रवाना केले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी सेल्फी व्हिडीओ जारी करत आम्हाला पळून जाण्यासाठी गाड्या पाठवू नका, असे म्हटले. तसेच मदत करणारच असाल तर लढण्यासाठी शस्त्र द्या, असे म्हणत त्यांनी रशियाविरुद्ध इरादे स्पष्ट केले. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संपर्क साधला. मॅक्रॉन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलन्स्की यांना फोन कॉल केला. यावेळी त्यांनी युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले आहे. युक्रेन या आमच्या मित्र राष्ट्राला शस्त्रास्त्रे आणि लष्करी मदत पाठवली जात आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच युक्रेन युद्धविरोधी भूमिकेत असून त्याला सहकार्य करण्याची तयारी फ्रान्सने दाखवली आहे.
युक्रेनची राजधानी कीवला रशियन सैन्याने वेढा दिल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटीतील देश आता युक्रेनच्या मदतीला धावत असून या देशांकडून मदत मिळू लागली आहे. नेदरलँडने युक्रेनला २०० अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रे दिली आहेत.
दरम्यान, कीवमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये रस्त्यावर युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय की, रशियन सैन्य रुग्णालयं आणि नागरी आस्थापनांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे चीनने म्हटले की, एखाद्या देशाला आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि हे युक्रेनलाही लागू होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग आला आहे.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…