रामसेतू संदर्भात कोर्टाने मागितले केंद्र सरकारचे मत

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या रामेश्वरम पासून श्रीलंकेपर्यंत समुद्रात असलेल्या रामसेतूला ऐतिहासिक स्मारक घोषित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र सरकारचे मत मागवले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरुन केंद्र सरकारला उत्तर मागत सुनावणीसाठी पुढील 9 मार्चची तारीख निश्चित केली आहे. स्वामी यांनी यापूर्वी 2020 मध्ये रामसेतूला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्यावा, यासाठीच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी कोर्टाने यावर नंतर विचार करु, असे म्हटले होते. त्यावेळी देखील न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होतें. हिंदू धर्मामधील एक पवित्र ग्रंथ रामायणमध्ये नमूद केल्यानुसार, 'वानर सेने'च्या मदतीने श्रीराम लंकेमध्ये पोहोचले होते. त्यावेळी मधला समुद्र पार करण्यासाठी वानर सेनेने हा रामसेतू बांधला असल्याचं सांगितले जाते. मात्र, 2007 मध्ये एएसआयने म्हटले होते की, याबाबतचा कोणताही पुरावा उपलब्ध नाहीये. रामसेतू आणि त्याच्या आसपासच्या भागाची प्रकृती आणि पाण्याखालील पुरातात्विक घटकांचा अभ्यास करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत